वेल, हा प्रश्न कधीपासून चालत आला असावा? लग्न संस्था आकाराला आली तेव्हा, त्याच्याही आधी, की लग्न संस्था इव्हॉल्व्ह होत गेली त्या वाटचालीत?
प्रेम आणि नातं, प्रेम आणि नात्याचा शारीर पातळीवरच्या निष्ठेशी संबंध आणि न-संबंध, पुनर्भेट आणि त्यावेळी प्रेमाचा "अत्युच्च" बिंदू, प्रतारणा की नैसर्गिकता... न संपणारी मालिका.
या प्रश्नात माणसासमोरच्या पेचाची उत्तरं फारशी वेगळी असत नाहीत. ती दिली जाताना नैतीक-अनैतीक या तात्त्विक जंजाळातून आपण बाहेर येऊ असंच माणूस म्हणत असतो. नैतीक-अनैतीक काय या संकल्पनांची ती मर्यादा असावी.
माणसाची मर्यादा? माणसावर ही मर्यादा माणसानंच निर्माण केलेल्या एका व्यवस्थेनं बाहेरून लादली असावी, असं या अशा माणसांच्या बाबतीत दिसतं. योग्य-अयोग्य हे त्या-त्या व्यक्तीच्या धारणेनुसार ठरेल. व्यवस्था म्हणून उत्तर देता येऊ शकतं, पण ते माणसाला समजून घेणारं नसतं इतकंच.