मुंबईवर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणारा एकमात्र जीवंत आरोपी अजमल कसाब याचे वकीलपत्र घेण्यावरून सध्या वाद-प्रतिवाद सुरू आहे. अंजली वाघमारे यांनी त्याचे वकीलपत्र घेतल्यानंतर शिवसेना, मनसे तसेच अन्य मंडळींनी त्यास तीव्र आक्षेप घेत वाघमारे यांच्या घरासमोर निदर्शने केली. वाघमारे यांनी कसाबचे वकीलपत्र घेऊ नये म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. मात्र हे वकीलपत्र घेण्यावर अंजली वाघणारे ठाम आहेत. भारतीय घटना असे सांगते की, कोणताही खटला न्यायालयात उभा राहण्यासाठी आरोपीला वकील असणे आवश्यक आहे. कसाबला वकील दिला नाही तर हा खटलाच उभा राहणार नाही व खटलाच उभा राहिला नाही तर कसाबला शिक्षा कशी होणार, असा युक्तिवाद करण्यात येत आहे. व त्याच मुद्द्यावर आपण वरिष्ठांच्या आदेशानुसार कसाबचे वकीलपत्र घेतले असल्याचे वाघमारे यांचे म्हणणे आहे. हे म्हणणे मान्य केले तरी एक सर्वसामान्य राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून मनात काही प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांवर व्यापक जनजागणर आणि कायदातज्ज्ञ व राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी नव्याने विचार करण्याची गरज आहे.

.... पुढे वाचा - हवाय कशाला कसाबला वकील