मिलिंदजी,
मला २ रा शेर नीट कळला नाही.. शिवाय मतल्यात ठसे पुसण्याची काय आवश्यकता आहे ते नीटसे कळले नाही..
मला हा शेर असा करावा वाटतोय..

गाव हा नाही तुझा, वा.. तुझी ही माणसे
जा पुढे पण मागुती, राहु दे काही ठसे!.. असा काहीसा आशय असलेला.. ह्यात एक सकारात्मक दृष्टी कोन दिसू शकतो.. अर्थात हे माझे मत आहे..
पावसाचे आगमन दूर नाही फारसे
चेहऱ्यावर काजळी, नेत्रही गर्भारसे.. हा शेर 'भावगर्भ' आहे:)

 पु. ले. शु.
-मानस६