दूरान्वये संबंध नसणे हा तृतीया विभक्तीतील नकाराथी प्रयोग सर्वच जण करतात. (तिथेही टॉटॉलॉजी आहेच.) पण म्हणून, नकारेतरार्थी प्रयोग वापरूच नये असे काही बंधन नाही.

'दूरान्वयाचा संबंध' यात संबंध या अर्थाचे दोन शब्द आलेले दिसले तरी एकाचा अर्थ जोड, योग किंवा कनेक्शन असा आहे आणि दुसऱ्याचा नाते-रिलेशन.  म्हणजे एकूण अर्थ दूरचा नातेसंबंध--नुसता दूरचा संबंध नाही, तर दूरचा नातेसंबंध!