या असैनिकी कसरतीचा योग्य असा दाखला म्हणजे सैनिकी / कमांडो कसरती. कोणत्याच बाबतीत यांचे योगदान वा वेदना, त्यांच्या पेक्षा कमी नाही. याची जाण घरातल्या पुरुषांना असणे फार फार महत्त्वाचे.
1. हाउसवाइफ म्हणून जबाबदारी पार पाडताना स्त्रीला कोणते मानसिक त्रास सहन करावे लागतात?
2. हाउसवाइफ म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडण्यासाठी स्त्रीने काय करावे?
अ] स्वतःच्या "कमलायकते च्या अपसमजा / गैरसमजामुळे" उद्भवलेले.
----सतत नवकौशल्य आत्मसात करावेत, जुने पाजळावेत. घरच्या घरी उत्पन्नांचे स्रोत शोधावेत. उदा. [ ऑनलाईन ट्रेडिंग तत्सम ]
ब] पारतंत्र्याच्या [ सासुच्या ] मानसिकतेतून उद्भवलेले.
---- नोकरीत देखील हेच करावे लागते, तिथले पारतंत्र्य मालकाचे वा व्यवस्थापकाचे असते अशा सकारात्मक विचाराने वेदनांची तिव्रता कमी करता येईल.
क] रहाटगाडगे ओढल्याच्या भावनेतून होणारे.
---- सृजनात्मक छंद जोपासावेत, स्वतःसाठी वेळ द्यावा.
ड] कामाचा उरक नसल्यास उद्भवणारे.
---- कामाच्या ठिकाणी, मुबलक हवा व प्रकाश खेळवण्याने व बहूकार्यसिद्धी [ मल्टीटस्कींग] च्या सरावाने.
इ] वादविवाद, भांडणे यातून उद्भवणारे.
---- योगासने, व्यायाम, सात्त्विक चौरस आहार, सुगम संगीताच्या श्रवणाने, अनेक थेरपींच्या सहायाने, उदाः ऍरोमाथेरपी, ज्यूसथेरपी, खळखळून हसवणाऱ्या साधनांच्या मदतीने व नवरोबांच्या भक्कम आधाराने.
धन्यवाद.