परवा मी एका ख्यातनाम चित्रकाराशी बोलत होतो. कोणत्याही देशाच्या ऱ्हासाला किंवा बांधणीला तिथल्या समाजाची सौंदर्यदृष्टी कारणीभूत असते असे अत्यंत महत्त्वाचे विधान त्यांनी केले. सुंदर ते वेचावे, सुंदर करोनी मांडावे, सर्वांसाठी ही त्यानी एकसंध समाजाची त्रिसुत्री जगातले अनेक देश फिरून आणि त्यांच्या समाज रचनांचा अभ्यास करून मांडली आहे. मला ते मनोमन पटलेही पण हे प्रतिसाद बघून तर त्याची प्रचितीच आली. सौंदर्यदृष्टी जोपासा म्हणजे असे पर्याय अनैसर्गीक आहेत हे कळेल. सौंदर्यदृष्टी आणि बुद्धिमत्ता (असित्वाची मूलभूत बुद्धीमत्ता ज्यामुळे हा सूर्य प्रकाशमान आहे, ही पृथ्वी आणि ग्रह तारे ठराविक कक्षेत फिरताहेत, तुमचा श्वास चालू आहे, ही सृष्टी प्रकट आहे) यांचा फार जवळचा संबंध आहे. त्यामुळेच तर सत्यं, शिवं सुंदरं असे परमात्म्याचे वर्णन केले आहे. तुम्ही स्वतः न केलेले प्रयोग व्यर्थ आहेत. असे प्रयोग दुसर्यांना सांगू नका. मी जे लिहीले आहे ते मी स्वतः गेली दोन दशके जगलो आहे. महावीरा सारख्या अत्यंत तैलबुद्धिच्या माणसानी भूक हा शरीर शुद्धी, व्याधी मुक्ती, मोक्ष आणि मृत्यू यावर (स्वतःवर प्रयोग करून) शोधलेला आणि सांगीतलेला मार्ग आहे.