अतिशय तरल आणि सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती असेच लिहीत रहा.

 पण एक विचार मांडावासा वाटतोः ही रिलेशनशीप आपल्या अत्यंत जवळच्या आणि लाडक्या व्यक्ती बरोबर, आपल्या स्वतःच्या सखी बरोबरही होऊ शकते. आणि अशी रिलेशनशीप किंवा याहीपेक्षा गहीरे रंग त्यात येऊ शकतात. मी मानवी संबंधांचा आणि मनाचा सखोल अभ्यास केलाय त्यावरून सांगतो की सगळी नाती ही मानलेली असतात. माणूस सोडता निसर्गात कुठेही नाते नाही. विवाह हे तर  केवळ मान्यतेचे नाते आहे मग ते असे रम्य का असू नये? मी हे अनुभवानी आणि तरीही पूर्णपणे निर्वैयक्तीक होऊन सांगतो की या वर्णनापेक्षाही सखोल नाते आणि संवेदनेची वेगवेगळी दालने पत्नी बरोबर उलगडता येतात आणि ते जास्त वास्तव, सोपे आणि (समाजमान्य असल्यामुळे)  अनिर्बंध होऊ शकते. एक कथा म्हणून ही मांडणी उत्कृष्ट आहे पण ते केवळ स्वप्नरंजन आहे. अश्यातून अनेकांच्या काहीच्याकाही इच्छा निर्माण होतील. हीच तरलता पत्नी बरोबर येण्याची मी तीन कारणे सांगतो : एक : पत्नीही सर्वमान्य सखी असल्यामुळे त्या नात्यात कमालीचे स्वास्थ्य आहे आणि आणाल तितकी अनिर्बंधता आहे, दोन: तीच्यासाठी संवेदनाक्षमतेसाठी केलेले सगळे प्रयत्न तुम्हाला कायमचे उपलब्ध होतात, आणि तीन : तिने आपल्यासाठी जे काही केले त्या सगळ्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा मला तो एकमेव मार्ग दिसतो. मी पत्नी हे नाते तीन अंगानी बघतो : एक वाट्टेल ते शेअर करता येऊ शकणारी मैत्रीण, जीचा आपण संभाळ आणि विकास करायचा आहे अशी मुलगी आणि जीचा कधीही आधार घेता येईल आशी आई. तुला काय वाटते?

बाय द वे हे असे दिर्घ लिखाण कुठले सॉफ्ट्वेअर वापरून आणि कसे केले आहे ते कळेल का?        संजय