भूषण,
अगतिकतेच्या मुद्द्याशी सहमत.
पुणे हे मुंबईपेक्षा राहण्यासाठी खूपच चांगलं शहर आहे - हवामान, वेळेत घरी पोहोचणं, कमी घाम येणं, रस्त्यावर आजूबाजूला आपल्यासारखीच माणसं दिसणं - यामुळे, असं मला वाटतं.
एकमेकांशी जुळवून घेणं, पटकन मित्र होणं या बाबतीत माझे मुंबईकरांबद्दलचे अनुभव अधिक आहेत. पुण्यातले लोक याबाबतीत (लोकलने फारसा प्रवास करत नसूनही) 'आतल्या' लोकांना बाहेरून कुणी आत येऊ नये असं वाटत असतं तशा प्रकारचे आहेत असं वाटतं. बाहेरून आत आलेले लोक मुंबईत (लोकलमधे आत आल्यावर) आतल्यांतलेच होतात, तसं पुण्यात पटकन होत नाही. (हे चांगलं की वाईट ही वेगळी चर्चा होऊ शकेल.)
- कुमार

(काही भाग वगळला. : प्रशासक)