श्रावण तुमचं म्हणणं बरोबर आहे.  व्यवस्था म्हणून उत्तर देता येतं.  पण त्याला खूपच मर्यादा असतात.  मनुष्य स्वभावाच्या प्रत्येक पैलूचा विचार करणं व्यवस्थेच्या आवाक्याबाहेरचं असतं आणि म्हणूनच व्यवस्थेबाहेरचं असं काहीतरी जेव्हा घडतं तेव्हा त्याची कथा होऊ शकते.  हे शतकानुशतकं चालत आलंय आणि शतकानुशतकं चालत राहील.  फक्त व्यवस्था आणि मनुष्य स्वभावाचे पैलू काळानुसार बदलत राहतील. त्यामुळे काळानुसार 'व्यवस्थेबाहेरचं'ही बदलत राहील.