प्रिय संजय, प्रथम तुझ्या सविस्तर प्रतिसादा बद्दल धन्यवाद. बव्हंशी तुझं म्हणणं मला मान्य आहे. आणि माझ्या कथेतही नायक नायिका दोघंही नायिकेच्या सांसारिक नात्याचा योग्य तो आदरच करतात. नायिका हेही परत परत सांगते की तिच्या वैवाहिक जीवनात ती पूर्ण सुखी आहे.
संवेदनेची वेगवेगळी दालने पत्नी बरोबर उलगडता येतात आणि ते जास्त वास्तव, सोपे आणि (समाजमान्य असल्यामुळे) अनिर्बंध होऊ शकते.
हे तुझं म्हणणं मान्य आहे. पण याचा अर्थ म्हणून असे नातेसंबंध फक्त पत्नीबरोबरच असू शकतात, दुसऱ्या कुणाबरोबर होऊच शकत नाही किंवा होताच कामा नये असं काही नाही. आपला आतला आवाज, आपलं मन, आपलं काँन्शस जे सांगेले ते ऐकावं, हीच तर कथेची मूळ कल्पना आहे. कारण तो आवाज दाबून ठेवून स्वतःची घुसमट करून घेणं माझ्या तरी मते अयोग्यच आहे.
एक कथा म्हणून ही मांडणी उत्कृष्ट आहे पण ते केवळ स्वप्नरंजन आहे.
हे मला तितकसं पटत नाही. या कथेतला नायक आणि नायिका दोघेही माझ्या ओळखीचे आहेत आणि अशी घटना हे पूर्णपणे स्वप्नरंजन नाही. वास्तव आहे, फक्त मी डीटेल्समध्ये थोडेसे बदल करून ते थोडसं कलात्मक रीतीनं कथास्वरूपात सादर केलं आहे इतकंच.
असे दिर्घ लिखाण कुठले सॉफ्ट्वेअर वापरून आणि कसे केले आहे ते कळेल का?
हाच प्रश्न मला तुला किंवा संबंधित सगळ्यांनाच विचारावासा वाटतो. एवढं मोठं लिखाण मनोगतावर टंकणं हा एक मोठाच उपद्व्याप होऊन बसतो. तरीही मला वाटतं इतर मसं पेक्षा मनोगत वापरायला बरंच सोपं आहे. कुणी या बाबतीत अधिक मार्गदर्शन करू शकेल का?