प्रिय मिलिंद, प्रतिसादा बद्दल धन्यवाद!

संबंध अनेकांन बरोबर असू शकतील पण अनुभवसाठी आसुसलेले मन नवनवीन अनुभव मागत राहते आणि अनुभवणारा जो आहे तो स्वतःला विसरून जातो.

 मनचे तीन पैलू आहेत : नवीन अनुभवासाठी तुम्हाला भुलवणे,  मिळालेलं अनुभवताना त्या जागी नसणे आणि  नंतर पश्चताप करायला लावणे. पण एकदा का तुम्हाला कळलं की अनुभवणारा सगळ्या अनुभवात सारखाच रहतो की सगळ्या मनाचं रूपांतरण उत्कट जाणिवेत होत. मग प्रत्येक अनुभव सखोल आणि तृप्तीदायी होतो. त्यामुळे तुमची सखी कोण आहे हा प्रष्णच संपतो. तुम्ही दोघंही एकच अनुभव उपभोगता. अशी खोली आणि अनिर्बंधता येण्यासाठी मन पूर्णपणे शून्य हवे.

या निर्मन अवस्थेसाठी जीच्या विषयी आपल्याला कृतज्ञता आहे, जीला आपल्याला काही द्यायचं आहे अशी व्यक्ती हवी. अनुभवाची नवी परिमाणं शोधण्या एवजी जे काही मिळालं आहे ते शेअर करण्याचा ध्यास हवा.  जे नाही त्याच आकर्षण म्हणजेच तर मन. सांगणारे भरभरून सांगतात पण प्रत्यक्षात मन (म्हणजे विचारांचे आवेग) थांबल्या शिवाय सगळे भोग अत्यंत वरवरचे असतात. तुझ्या कथेतच बघ ज्या स्त्रीची चितःदशा द्विधा आहे ती उपभोगाला काय सामोरी जाणार? नायकाला मोकळीक आहे पण नायिकेला कुठे? आणि जी द्विधा स्थिती उपभोगा नंतर होते ती उपभोगाच्या सुरूवातीलाच असते फक्त एक्साइटमेंट मुळे जाणवत नाही. त्यामुळे कथे सारखा अनुभव फक्त तेव्हांच येईल जेंव्हा घटना न ठरवता घडेल पण तेंव्हा नायक आणि नायिकेची अशी ओळख असणार नाही. आणि तुम्ही एकदा पत्नी हे नाते विसरलात की तुमच्या सोबत असलेली नयिकाच अशी अनोळखी नयिका होते. (क्या बात है!)

संजय