मराठीत इंग्रजी शब्द जास्त येत आहेत यामुळे दुःखी होणाऱ्यांसाठी दुसरे टोक दाखवणारा एक प्रसंग.
आज एक बंगाली मित्र घरी आला होता. त्याला हिंदीचे फारसे प्रेम नसल्याने आमचे संभाषण इंग्रजीतून चालते. तो आल्यावर काहीतरी वेगळे करावे म्हणून कांदापोहे करायला घेतले. त्यासाठी कांदे, बटाटे चिरत असताना त्याने विचारले काही मदत हवी का? त्याला कोथिंबीर निवड असे सांगायचे होते पण इंग्रजीतून "कोथिंबीर निवड" कसे सांगायचे? हा प्रश्न न सुटल्याने शेवटी कोथिंबीरीची ताटली त्याच्यापुढे ठेवली. तो काय समजायचे ते समजला आणि त्याने कोथिंबीर निवडली. 
हॅम्लेट