मी प्रथमच 'मतवाला' झालो होतो तेव्हा मतदान करताना जी मतपत्रिका मला मिळाली तिच्यावर आणि तिच्या स्थळप्रतीवर अनुक्रमांक होता. मला मतपत्रिका देताना स्थळप्रतीवर माझी सही घेतली होती. मग हे मतदान गुप्त कसे म्हणता येईल? शोधून काढायचेच असेल तर एखाद्याने कुणाला मत दिले हे (पुष्कळ कठीण असले तरी) शोधून काढता येईलच की.
हा प्रश्न विचारणारे पत्र मी तेव्हा सकाळला पाठवले होते. ते प्रकाशित झाले की नाही ते मात्र आता लक्षात नाही.