जर गुजराती लोकं बडोदा म्हणत असतील तर आपण मराठी लोकांनी अट्टाहासाने केवळ इंग्रज बरोडा
म्हणत होते म्हणून बरोडा म्हणायला सुरवात करायची का हा आहे. जर कानडी लोकं सरसकट कर्णाटक
असे म्हणतात तर केवळ इंग्रजांनी त्याचे कर्नाटक केले म्हणून आपण त्याला कर्नाटक म्हणायचे का?
माझ्या संपर्कातील अनेक कानडी लोकं कर्णाटक / कर्णाटका असाच उच्चार करतात. ज्यात त्यात संस्कृत
भाषेचा मुद्दा आणून विषयाला फाटे फोडणे हे दुर्दैवी आहे. (आयआयटी, मुंबईतील भाषा तज्ज्ञांच्या मते
इंग्रजी लेखाचा अनुवाद मराठीमध्ये करताना चांदणी चौक हा शब्द चांदनी चौक असाच लिहिला पाहिजे कारण
स्थानिक उच्चार तसाच आहे).