निखिल गाडगीळ यांना धन्यवाद. त्यांनी आप्पा बळवंत हे 'मेहेंदळे' आहेत हे जवळजवळ ठाममणे सांगितले. त्यावरून पुढे शोध घेणे सोपे गेले. शोधान्ती सापडले की, "हत्तीवर बसून पेशव्यांची स्वारी जेव्हा चौकातून चालली होती, तेव्हा हत्तीचा पाय मुडपला आणि पेशवे घसरून खाली पडले. ते हत्तीच्या पायाखाली चिरडले जाणार तोच धावत येऊन अप्पा बळवंत मेहेंदळे नावाच्या त्यांच्या सरदारांनी त्यांचे प्राण वाचवले, म्हणून या चौकाला मेहेंदळ्यांचे नाव देण्यात आले. त्यांचे पौत्र खंडेराव कान्हेराव मेहेंदळे यांनी पानिपतच्या लढाईत पराक्रम गाजविल्याने त्यांच्यावर खूश होऊन, त्यांचे घोडदळ चरायला पेशव्यांनी कोथरूड येथे त्यांना ३६ एकर जमीन दिली. त्यांच्या १०व्या-११व्या वंशजांनी आता तेथे बळवंतपुरम साकारले आहे."
आता या चौकाचे नाव बदलून त्याचे एल्बीएस चौक किंवा बँनापै चौक असले नामकरण करायला कुणी सच्चा पुणेकर धजावेल?