१७ वर्षे मी सरकारी नोकरी केली त्यात लोकसभेच्याच सहा अन राज्यसभा व विधानसभेच्या ही निवडणुकांचे काम न चुकता केले आहे. अर्थात मुंबईत. निवडणुकांचे हक्काचे (बळीचे ) बकरे आम्ही. तुम्ही छान मांडले आहे. माझ्याही बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. त्यात भरीला एक सेन्सस ड्युटीही केलेली. फारच गमतीजमती होत. एकदा का तुम्ही अनाहुतपणे ह्या चक्रात अडकलात की नोकरी संपेपर्यंत सुटका नाही. असे असले तरी मजाही येते हे नक्की. धन्यवाद.