कोण्या आधुनिक शिवाजीरावांच्या नावाने हा रस्ता असता तर त्यावर मा. पिताश्री शिवाजीरावजी भोसलेजी पथ असे नाव रंगवलेले दिसले असते. तसे नाही त्याअर्थी तो छत्रपती शिवाजीच्या नावाचाच. याच रस्त्यावर शिवाजीचा, आत्तापर्यंत घडवलेल्या सर्व पुतळ्यात देखणा असा, भव्य पुतळा आहे आणि पुढे शिवाजी मराठा हायस्कूल आणि त्याच नावाचे महाविद्यालयदेखील. 

कुमठेकर रस्त्याचे नाव रा.ब.(रावबहाद्दुर)कुमठेकर असे आहे(रा̱.ग.नाही!). हे पुण्याचे एक प्रतिष्ठित गृहस्थ होते. "१८८५ मध्ये स्थापन झालेल्या गणू शिंदे यांच्या दुकानात आइस्क्रीम आणि थंड पेयांचा आस्वाद घेण्यासाठी तत्कालीन प्रतिष्ठित पुणेकरांपैकी रावबहाद्दुर तात्यासाहेब कुमठेकर, असिस्टंट कमिशनर गणेश चिमणाजी वाड, अंजनगावकर, शाबाजीराव तिरोडकर वगैरे येत. गणपराव स्वत: आइस्क्रीम देण्याचे काम करत असत, त्यामुळे गिऱ्हाईकाची कोणतीच तक्रार नसे." असे पुण्याच्या 'आइस्क्रीमच्या इतिहासा'त लिहिले आहे.  

आता नेमके याच रस्त्याला त्यांचे नाव का दिले ते शोधणे शक्य व्हावे.--अद्वैतुल्लाखान