कदाचित ती लोकं अत्यंत गरीब, गलिच्छ असतील म्हणून तुम्हाला तसे वाटत असेल. दुसरी गोष्ट, आपल्याकडे सिनेमातून दाखवले जाणारे गे (हा शब्द सुटसुटित वाटतो) हे गे कमी, छक्के जास्त वाटतात (ते सुद्धा विकृत चाळे करणारे). त्यामुळे सुद्धा घृणा उत्पन्न होते. पण वास्तविक, गे हे सुशिक्षित, सुसंस्कृत कुटुंबात देखिल जन्माला येतात. मध्यंतरी, मुंबईत माझ्या जवळच्या नात्यात एका मुलीला घटस्फोट घ्यावा लागला. लग्नानंतर कळालं की मुलगा गे आहे. हे जर आधी कळलं असतं तर... त्यामुळे, समलैंगिकतेविषयी शास्त्रिय माहितीतून समाज प्रबोधन होणं अत्यंत आवश्यक आहे.