चला तुमची करमणूक तर झाली. मुळात तुम्ही उल्लेखलेली जी नावं आहेत, ती त्यांच्या कार्यक्षेत्रात श्रेष्ठ आहेत, वैयक्तिक जीवनात कसे वागतात कोणाला माहिती. पुलंच्या दारू पिऊन पडण्याच्या गोष्टी मी लहानपणापासून ऐकतो आहे. प्रत्येक महापुरुषावर चर्चा करायला इथे वेळ नाही.
मुद्दा असा आहे की, आजुबाजूला घडण्याऱ्या वाईट गोष्टींचा परिणाम माणसावर होत असतो. आणि मुंबई मध्ये सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी ह्या लोकांच्या मनावर आदळत असतात. त्यातूनच चांगल्या-वाईटाच्या सीमारेषा धूसर होऊ शकतात. एक उदाहरण सांगतो, माझ्या ओळखीतले मुंबईमधले काही मित्र आहेत, ज्यांच्याहातून कॉलेज जीवनात वेश्यागमन झाले आहे. अर्थातच, ते ही गोष्ट चांगली/योग्य मानत नाहीतच. तरी सुद्धा अशी चूक घडली. चूक-बरोबर हे नीट ठाऊक असूनही जेव्हा असे घडते, त्यालाच मी 'बौद्धिक अधिष्ठान' नसणे असं म्हणतो.
आता पुण्यातही असे प्रकार घडत असणारच, तरी माझ्या माहितीत असे प्रकार फारच कमी आहेत. त्यामानानी मुंबईची उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर जास्त आहेत.