दोघांना धन्यवाद.
पुन्यांदा काही प्रश्न,
ज्या पेशव्यांचे प्राण वाचवले गेले ते कोणते पेशवे? कारण पानिपताच्या युद्धात ज्यांनी पराक्रम गाजवला ते मेहेंदळे ह्या आप्पा बळवंतांचे पौत्र. म्हणजे ते पेशवे बाळाजी विश्वनाथ किंवा त्याही पूर्वीचे किंवा समकालीन कुणी आहेत का?
आप्पा बळवंत चौक हे नाव पेशवेकालीन की पुणे महानगरपालिका कालीन? (पेशवे कालीन असावे असे वाटत नाही कारण त्या काळी चौकांना नावे देण्याची प्रथा नसावी. चू. भू. दे.) महानगरपालिकेनेही इतिहासाचा इतका विचार करून ह्या चौकाला नाव दिलं असेल तर तत्कालीन महानगरपालिका कर्मचारी थोर होते.
क्षमा करा मी फारच प्रश्न विचारतो आहे. पण त्यानिमित्ताने माझ्या आणि इतर मनोगतींच्याही महितीत भर पडली तर चांगलेच की !
आता या चौकाचे नाव बदलून त्याचे एल् बी एस चौक किंवा बँनापै चौक असले नामकरण करायला कुणी सच्चा पुणेकर धजावेल?
नाय बा !
एल. बी. एस. किंवा बॅनापै सारखे नाव बदलले नसले तरी ए. बी. सी. म्हणायला लागलेत ह्या चौकाला. (सायबाच्या भाषेत बोलल्याशिवाय आपलं शहर पुढारलं असं वाटत नसावं बहुतेक )