आज आनंदात राहू, पाहुया पुढचे पुढे
वास्तवे बाजूस सारू, पाहुया पुढचे पुढे
मी नको आहे तुला हे माहिती आहे मला
एक छोटा जन्म काढू, पाहुया पुढचे पुढे
ढीग तक्रारी हिशोबांचे तुझे आणू नको
आज घे माझीच बाजू, पाहुया पुढचे पुढे.. चांगला आशय, सुटसुटीत गझल.. !
-मानस६