समलैंगिकतेमुळे जेवढी लग्नसंस्था धोक्यात येईल त्यापेक्षा स्ट्रेट(?) माणसांमुळेच लग्नसंस्था दसपट धोक्यात येताना दिसेल. (म्हणजे असे काही झालेच असेल तर)
शिक्षण झालं आता उच्चशिक्षणासाठी परदेशी जायचे आहे. उच्चशिक्षण झाले आता डॉक्टरेट मिळवायची आहे. डॉक्टरेट मिळवली आता मनाजोगती नोकरी मिळवायची आहे. लग्न करू सावकाश असा विचार करणारे आणि मग एकटे राहिलेले.
मी इतका शिकलेला/ली, माझ्या तोडीचा जोडीदार, दिसायला सुंदर, गुणी, माझ्या आवडीनिवडी जुळणाऱ्या हव्यात अशा वाटताना माफक दिसणाऱ्या पण नंतर डोईजड होणाऱ्या अपेक्षा बाळगणारे.
एकटे राहण्यात गंमत आहे. लग्नाची जबाबदारी घेऊन सुखासुखी जीव कशाला धोक्यात घाला असा विचार करणारे.
आणि असे अनेक स्ट्रेट मुलगे-मुली समाजात सापडतील त्यापेक्षा फारच कमी समलिंगी समाजात सापडतील त्यामुळे लग्नसंस्था धोक्यात आलीच असेल तर त्याचा ठपका समलिंगींवर लावणे थोडे अति वाटते.