श्री.  ह. अ. भावे , श्री. खानोलकर आणि श्री वझे अशा तीनही मराठी - इंग्रजी  शब्दकोशात निखंदणे असा शब्द दिला असून त्याचा जो अर्थ इंग्रजीत  दिला आहे तो मनोगतवरील इंग्रजी शब्दसंख्येच्या मर्यादेमुळे देता  आला नाही पण त्या इंग्रजी अर्थाचा मराठी अर्थ काहीसा तिरस्कार करणे, निंदा करणे असा आहे.. त्या तीनही कोशात निखवणे हा शब्द सापडला नाही. वृत्तातील मात्रा जुळण्याच्या दृष्टीनेही निखंदिताहि  (निखंदिताही नव्हे) बरोबर आहे. ही दीर्घ होण्याचे कारण मनोगतावरील शुद्धलेखन चिकित्सकातील शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ करण्याच्या सूचनेचा परिणाम हे असावे. काव्य अतिशय सुयोग्य आणि सुनिबद्ध आहे.