आत्तापर्यंतच्या चर्चेतून असे दिसते की याला विरोध करणाऱ्या मंडळींचा विरोध हा भावनिक आहे.
सहमत आहे. मी थोडे अधिक सांगायचे तर असे म्हणेन की, यासारख्या गोष्टींकडे "भावनात्मक" दृष्टीने बघणे , "वस्तुनिष्ठ" दृष्टीने न बघणे हा या साऱ्या संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. "अज्ञात गोष्टींचे भय आणि तज्जन्य तिटकारा" - फिअर ऑफ द अननोन अँड द फोबिआ टोवर्डस इट- या सदरात हे येऊ शकेल.
वर "याची तुलना अस्पृश्यतेच्या समस्येशी करणे अयोग्य " असे म्हण्टले आहे. कुठल्याही दोन समस्या , बाबी भिन्न असतातच ; मी त्यांची तुलना न करता , समाजाचा एकाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा हळुहळू बदलतो हे विशद करायला त्याचे उदाहरण घेतले होते. असो.