मुंबईतला उन्हाळा... पहाटेच तगमगींनं जागं केलं. गच्चीत गेलो. कांही वेळाने वाऱ्याची झुळुक हलका स्पर्श करून सुखावून गेली.. लिंक जुळत गेली. त्या झुळुकेची कांही रूपं आठवली. निसर्गात त्या त्या रूपांना मिळणारे प्रतिसाद आठवले.. कागदावर उतरले. कुठंतरी मानवी जीवनातही असेच घडते. 'टिचकी' म्हणजे अंगठा व पहिले बोट यांचा वापर करून अगदी हलकासा आघात.

स्वेच्छे मरणास आलिंगन देते ती एखाद्या माडाची झावळ. (वादळात माडही भुईसपाट होताना दिसतात.)

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. बहुधा माझी अभिव्यक्ती तोकडी पडलेली दिसतेय. दिलगीर आहे.