तुम्ही ज्याप्रमाणे हा प्रश्न विचारलात तो कल माझ्या लक्षात आला !यावरूनच वाचकांच्या लक्षात येइल कि समलैंगीक लोकांची बाजू घेतली कि लोक त्या व्यक्तिलाच समलैंगीक समजायला लागतात ....
अहो मुल्लासाहेब,
आपण कुठला कल म्हणत आहात कळाले नाही. आपण जो निष्कर्ष मांडला तो कसा मांडला इतकेच विचारले होते. शिवाय या संपूर्ण चर्चेत मीही समलैंगिक लोकांच्या बाजूनेच बोलतो आहे हे कृपया लक्षात घ्यावे. आता याचा अर्थ लोक मला समलैंगिक समजायला लागले आहेत असा घ्यावा का? समजत असले तर समजोत बापडे. तो त्यांचा प्रश्न आहे. यासारख्या गंभीर चर्चेमध्ये लोक काय म्हणतील याची पर्वा करण्यापेक्षा मला जी बाजू बरोबर वाटते तिचे समर्थन करणे अधिक महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आणि असे खरेच असेल तर आत्तापर्यंत या चर्चेत समलैंगिक लोकांच्या बाजूने इतके कमी प्रतिसाद का आले याचे एक कारण हे असू शकेल.
३-४ लोकांवरून निष्कर्ष काढणे बरोबर आहे असे वाटत नाही.
हॅम्लेट