समलैंगिक "बनता" कसे येते, हे कोडेच आहे; पण "बनायचेच" असेल तर समर्थकांच्या समर्थनाची वगैरे गरज पडायची नाही. आंतरजालाच्या नि आधुनिक प्रसारमाध्यमांच्या जगात स्वेच्छेने, सवतःहून समलैंगिक "बनणे" हे तितकेसे कठीण नाही. असो. मुळात अशी "बनवाबनवी" करता येत नाही / होत नाही; ती एक मूलभूत, नैसर्गिक भावना असावी. जाणत्या वयात येईस्तोवर आपल्यात अशी समलैंगिक आणि/किंवा विषमलैंगिक भावना किती प्रबळ आहे, याची जाणीव न झाल्याने त्या व्यक्ती स्ट्रेट्, गे किंवा लेस्बिअन् किंवा बाय् या वर्गांत मोडत नाहीत इतकेच. पण एकदा त्या भावनेची जाणीव झाली की आपण नक्की कोणत्या लैंगिक वर्गात मोडतो, हे न कळण्याइतपत अजाण वयही उरत नाही.

कर्तव्य/अकर्तव्य ठरवणे म्हणजे तुम्हांला लग्न ठरवण्याबाबत बोलायचे आहे, असे मानून पुढचे लिहितो. मुळात विवाहसंबंध प्रस्थापित होण्यासाठी भावी जोडीदाराबद्दलचे वाटणारे आकर्षण (यात केवळ लैंगिक आकर्षणाचा विचार केला आहे) किती कसे प्रबळ नि समलैंगिक की विषमलैंगिक याचा विचार विवाहेच्छुकांनी केल्यास स्वतःच स्वतःचा निर्णय घेणे - अगदी लग्न करण्याचा किंवा न करण्याचा, करायचे झाल्यास समलिंगी व्यक्तीशी की विषमलिंगी व्यक्तीशी वगैरे - जास्त सोपे. हे लिहिताना एखाद्या व्यक्तीबद्दलचे अलैंगिक, विशिष्ट गुणावगुणाधिष्ठित किंवा माणूस म्हणून वाटणारे आकर्षण, विवाहसंबंध जुळवताना त्यात सहभागी होणारी घरची मंडळी, त्यांचे विचार, दबाव इ. इ. चा विचार केलेला नाही.