लेखमालिका खूप आवडली. सगळेच मुद्दे पटले नाहीत तरी.

प्रत्येक कठिण प्रसंगी जगाने धांवून यावे नि तुम्हाला सोडवावे, अशी अपेक्षाच करू नका. तसे होणारही नाही. परमेश्वरावर अढळ श्रद्धा असूं द्या. परमेश्वर पाठीशी असेल आणि सारी दुनिया जरी तुमच्या विरोधात उभी ठाकली, तरीही तुम्ही यशस्वी व्हाल. पण परमेश्वरी साहाय्य नसताना साऱ्या दुनियेच्या साहाय्यानेदेखील तुम्ही हराल. म्हणूनच परमेश्वराची मैत्री संपादन करा. ती परमोच्च संपत्ती आहे. कोणत्याही आपत्तीतून तो सहीसलामत तुम्हाला तारेल.

कसोटीस उतरलेले ठराविकच मित्र असावेत. ओळखी-पाळखी वाढवित बसू नका. कुणाबरोबरही घसट वाढवू नका. अति तेथे माती. कुणाच्या अधिक जवळ जाणे म्हणजे अवमानित होणे, भावना दुखावल्या जाणे, मनाला क्लेष निर्माण होणे हे सारे स्वाभाविकच होत असते.

अगदी! (माझे आवडते, लाडके तत्त्वज्ञान! )

आवडले, पटले.