साइझ आणि शेप यांना मराठीत अनुक्रमे, आकार आणि आकारमान असे शब्द आहेत. प्रोफाइल म्हणजे रूपरेखा, पार्श्वचित्र. याशिवाय या संकल्पनांच्या अर्थांमधील विविध छटा दाखविण्यासाठी आकृती, आकृतिपट, आकृतीमान, आकृतीबंध, आराखडा, आलेख, नकाशा,  नकाशाचित्र, परिमाण, परिमिती, बाह्यरेषाकृती, बाह्यरूप, मानचित्र, रेखाकृती, रेखाचित्र, रेषाकार, विस्तार, व्याप, समप्रमाणचित्र वगैरे वगैरे भिन्‍नभिन्‍न अर्थाचे अनेक शब्द आहेत. प्रत्येकाचा अर्थ समजावून घ्यावा म्हणजे इंग्रजी शब्दांचे लोढणे बाळगावे लागणार नाही. मराठीतही  असे अनेक शब्द आहेत की ज्यांना इंग्रजीत समर्पक प्रतिशब्द नाहीत. --अद्वैतुल्लाखान