या सोप्या तथाकथित अमेरिकन वाक्याचा एकमेव अर्थ(भाषान्‍तर नव्हे) संभवतो आणि तो म्हणजे--माझे(आणखी कुणाकुणांवर तर आहेच, पण)तुझ्यावरही प्रेम आहे. तसेच, 'आय टू लव्ह यू' चा अर्थ (इतरजण जसे तुझ्यावर करतात तसे) माझेही तुझ्यावर प्रेम आहे.  इथे व्याकरण/अमेरिकन संस्कृतीचा काही संबंध नाही.  व्याकरणाचे कुठलेही नियम लावलेत तरी हेच अर्थ निष्पन्‍न होणार. ऑल्सो वापरून किंवा शब्दाघात बदलून कदाचित अर्थ बदलता येतील.

मराठीत--माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझेही प्रेम आहे, तुझ्यावरही प्रेम आहे, तुझ्यावर प्रेमही अहे, तुझ्यावर प्रेम आहेही त्याशिवाय-- इतक्या किंवा याहूनही जास्त अर्थच्छटा दाखवणारी वाक्ये करता येतील. त्यांचे इंग्रजीत योग्य भाषान्तर होईलही, पण कसे?