शुमंना सेल्फफुल्‌फिलिंग प्रॉफेसीचा अर्थ कळाला नाही याचे कारण त्या शब्दाचा अर्थ शोधण्याच्या त्यांचा प्रयत्‍न चुकीच्या दिशेने झाला. आत्मसमर्थक प्रतिपादन अशा अवघड मराठी शब्दाकडून इंग्रजी शब्दाकडे जाण्यापेक्षा, मूळ इंग्रजी शब्द फारच सोपा आहे. कसा ते पहा. सेल्फ़ म्हणजे स्वत:, आत्म, स्व वगैरे. फ़ुल्ल म्हणजे पूर्ण, संपूर्ण परिपूर्ण वगैरे. फ़िलिंग म्हणजे अर्थात भरणे. आणि प्रॉफ़ेसी म्हणजे (देवदूताने वगैरे केलेली)भविष्यवाणी. एकूण अर्थ: परमस्वान्तसुखाचे भाकीत.

आता फ़िलिंगचा उच्चार फ़ायलिंग असेल तर अर्थ होईल: स्वत:चा पूर्णपणे भुगा होईल अशी भविष्यवाणी होणे.  

बरे, हा शब्द मानसशास्त्रातला आहे की मानसोपचारशास्त्रातला?  म्हणजे हे एखाद्या मनोविकृतीचे नाव आहे का? फॅलसी, प्लुरसी वगैरे शब्द विकृतीदर्शक आहेत म्हणून शंका येते.  की पॉलिसीसारखा हा शब्द कार्यप्रणालीच्या संदर्भातला आहे? --अद्वैतुल्लाखान