गणपतराव विठूजी शिंदे यांचे मूळचे दुकान बाहुलीच्या हौदापाशी, म्हणजे हल्ली दगडूशेठचा गणपती बसतो त्या चौकात होते. हे शिंदे सातारा जिल्ह्यातल्या खटावचे.  नगरपालिकेत मुकादमाची नोकरी करण्यासाठी ते पुण्यास आले. त्यांच्या औषधाच्या दुकानात त्यांनी १८८५ पासून लिंबू-सोडा आणि आइस्क्रीम ठेवायला सुरुवात केली. पुढे ते दुकान रस्तारुंदीत गेल्याने त्यांनी लक्ष्मीरोडला सध्याच्या जागी स्थलान्तर केले.