कोणतीही विकृती दोन प्रकारांत मोडते, नैसर्गिक आणि सामाजिक.
१. या सत्यपरिस्थितीनुसार जर आपण नैसर्गिकरित्या समलैंगिक असणाऱ्यांचा विचार केला तर ...... मला तरी वाटते की आपण त्यांना समजून घेउ शकतो. कारण त्यांचा काही दोष नसताना, काही जन्मजात शारिरीक दोषांमुळे ते असे बनतात. त्या अनुसार त्यांचे वागणे, बोलणे इ. इ. घडत असते. या प्रकारातील मुलांचे प्रश्न आणि त्यांना पालकत्व देण्यातील यातना फक्त त्यांचे आई वडीलच जाणोत! पण समाज हे समजून या प्रकारातील मुलांशी सामान्य मुलांसारखेच वागून, त्यांना इतरांप्रमाणे जबाबदार नागरिक बनवू शकतो.
आता शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या या वर्गासाठी सामाजिक संस्थांची मदत घेणे अनिवार्य आहे कारण त्यासाठी पुरेसा वेळ देणे - जे फारच धीराचे आणि सातत्याचे काम आहे ते इतर समाजाला सतत झेपणे कठीण आहे.
२. सामाजिक समलैंगिकतेची मात्र विकृतीतच गणना केली पाहिजे हे नक्की. काहीतरी नवे या एकाच विचाराने बहुतेक वयात येणारी मुले याकडे पाहता पाहता कधी याला बळी जातात ते त्यांचे त्यांनाही कळत नसेल! यातूनच आपण काही मन विषण्ण करणाऱ्या कॉलेजांतील वसतीगृहांच्या विकृत गोष्टी ऐकतो / वाचतो. यासाठी आज काल उपलब्ध असलेले इंटरनेट ९९% जबाबदार आहे असे मला तरी वाटते. अनिर्बंध विचारस्वातंत्र्य या एकाच नाण्यावर असे सर्व - आणि याहूनही विकृत - साहित्य खपते, ते थांबवणे सामाजिक आंदोलनानेच शक्य आहे.