एखादे विधान, जे चालूघडीला असत्य आहे किंवा जे खरे होईल की नाही हे सांगता येत नाही. असे विधान केल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होते की जी ते विधान सत्य ठरवण्यास कारणीभूत ठरते. अशा विधानाला सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी म्हणून संबोधले जाते. इथे मुद्दा हा की विधान करणे हा भाग त्या विधानाला सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी ठरवण्यास कारणीभूत असतो.याचे उत्तम उदाहरण म्याट्रीक्स चित्रपटात आहे.
निओ ओरॅकलला भेटायला गेल्यावर ती म्हणते,
"मी तुला बसायला सांगितले असते पण तू बसणार नाहीस. आणि त्या फ्लॉवरपॉटबद्दल काळजी करू नकोस. "
यावर तो विचारतो, "कुठला फ्लॉवरपॉट? "
आणि त्याचा फ्लॉवरपॉटला धक्का लागून तो फुटतो.
मग ओरॅकल म्हणते, "जर मी तुला याबद्दल सांगितले नसते तर तुझ्या हातून तो फुटला असता का? "
ओरॅकलची बहुतेक सर्व वाक्ये सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी या प्रकारात मोडतात.
याबद्दल अधिक माहिती इथे.
हॅम्लेट