"अर्थ माझा लावण्याचा यत्न साऱ्यांनीच केला!
शब्द मी आहे असा की, जो कुणालाही न गेला!

खेळ काही चाललेला अंगणी जाई-जुईचा...
अन् तिथे ओठंगलेला तारकांचा एक झेला!

राहिले बाकी तरीही आठवांचे थेंब काही....
रिक्त होईना मनाचा पालथा घालून पेला!"                   
... व्वा, प्रदीपजी- एकदम मस्त !