आप्पा बळवंत चौक हे नाव पेशवेकालीन की पुणे महानगरपालिका कालीन? (पेशवे कालीन असावे असे वाटत नाही कारण त्या काळी चौकांना नावे देण्याची  प्रथा नसावी. चू. भू. दे. ) महानगरपालिकेनेही इतिहासाचा इतका विचार करून ह्या चौकाला नाव दिलं असेल तर तत्कालीन महानगरपालिका कर्मचारी थोर होते. 

 माझ्याही डोक्यात हा विचार आला होता. पण मिळालेल्या माहितीवरून ते पेशवे बाळाजी विश्वनाथ असावेत असे वाटते आहे. अप्पा बळवंतांच्या वंशजांना विचारून खात्री करून घ्यावी लागेल. या प्रस्तुत एबीसी चौकाचे नाव पेशवेकालीन नाही आणि महानगरपालिकाकालीन तर अजिबात नाही. हे नाव पुणे ही जेव्हा अतिशय छोटी नगरपालिका होती त्या काळचे आहे. तेव्हाचे नगरकर्मचारी आणि नगरसेवक खरोखरच थोर होते. अनेकजण तुळशीबागवाल्यांसारखे सरदार आणि सावकार होते.  आचार्य अत्र्यांसारखे लेखक होते. अनेक सच्चे समाजसेवक होते.  त्यांची थक्काकारक यादी मिळवून केव्हातरी देईन.