ही माहिती खरोखरच उपयुक्त .  पण १०० रुपयांचे व्हाउचर किती दिवस चालणार?  का फक्त एकच माहिती घेतली की ते संपणार? कारण आपल्याला रोजरोज माहिती नकोच असते. जेव्हा लागेल तेव्हा व्हाउचर घेऊन ते कार्यान्वयित होईपर्यंत आपल्याला तो पत्ता धोपट मार्गाने सापडणारच.  पण ज्यांना नित्यनेमाने पत्ते शोधायचे आहेत त्यांनी जरूर या सुविधेचा फायदा घ्यावा आणि इतरांनाही करून द्यावा.

मुंबईच्या रस्त्यांचे एक पुस्तक ७०० रुपयांना (चार वर्षांपूर्वीची किंमत) मिळते; त्यात नकाशांची अनेक पाने आहेत.  मुंबई आणि नवीन मुंबईतील प्रत्येक रस्ता आणि त्या रस्त्यावर प्रत्येक इमारत त्या पुस्तकातल्या नकाशांत दाखवली आहे. मी, माझे परिचित आणि आमच्या सर्व नातेवाईक यांच्या घरांच्या इमारतींची नावे आणि तिथे जाण्याचे रस्ते यांची साद्यंत माहिती त्या पुस्तकात आहे याची मी खात्री करून घेतली आहे. 

दुर्दैवाने पुण्याचा एकही नकाशा अस्तित्वात नाही.