मोल्सवर्थ शब्दकोशात कलथा आणि कालथा असे दोन्ही प्रयोग दिसतात. मला मात्र आजवर 'कालथा' असेच म्हणायची सवय होती. 'कलथा' असा प्रयोग आजच कळला.
कलणे = एका बाजूला वळणे असा अर्थ घेतला तर कलता म्हणजे वळणारा (आणि म्हणून कालता म्हणजे वळवणारा असा अर्थ होऊ शकेल! जसे मरता = मरणारा मारता = मारणारा) त चा थ हा अपभ्रंशाने झालेला असावा. त्या पानावर दिसणारे सर्व शब्द वाचल्यावर केलेले हे सर्व अंदाज आहेत. पुरावा काहीही नाही.