तुमची मतं वाचली व तुम्ही लोकप्रभेतील जो लेख उल्लेखलेला होता तोही वाचला. पण तरीही मी माझ्या वर मांडलेल्या मताशी ठाम आहे. मी हिंदू आहे. ज्या देवांची मी पुजा करतो, ज्यांच्यापुढे मान वाकवतो ते पुरुष व स्त्री म्हणूनच पूजले जातात. त्यांच्यात तुम्ही ज्याला 'सामान्य बाब' समजता तसे काहीही नाही. माझे आई वडील ही सामान्य आहेत. मग असे असताना इतर विचित्र गोष्टींना मी कबूल का करायचे?
काळाच्या प्रवाहात जी गुणसुत्रे कुचकामी आहेत, वांझोटी आहेत त्यांचा आपोआप नाश होणं अटळ आहे. गुणसुत्रे कुचकामी आहेत हे नियतीने ओळखले की त्या शरीरात दोष निर्माण होणारच. ईथं मी स्वतःच्या शरीराचा गर्व करीत नाही आहे. माझं म्हणणं असं आहे की निसर्ग स्वतः चा न्याय-निवाडा स्वतःच करतो. माझा हिंदू धर्म सांगतो की फक्त अपत्यप्राप्ती साठीच शरीरसंबंध ठेवायला हवेत. मग तसं असताना पुढच्या दरवाजाने आत जावून, अमृत पिऊन, स्वर्गात जाण्याएवजी मागच्या दरवाजाने आत घुसून, विष चाखून, नरकात जाणाऱ्या वा जाऊ पाहणाऱ्या असुरांना व त्यांच्या कृत्यांना मी का बरं समर्थन द्यायचे? माझ्या धर्मावर व पोथी पुरांणामध्ये सांगितलेल्या चांगल्या गोष्टींवर माझा अजून ही विश्वास आहे.
मला समलिंगींबाबत काहीही माहीती नव्हती. ती ज्या प्रसंगांमुळे झाली (वा नियतीने घडून आणली) ती मी वरील प्रतिसादात विषद केली. कुठलाही माणूस जो त्याला अनुभव मिळतो त्यारूनच तो स्वतःची मते बनवित असतो. माझे ही तसेच आहे.
असे असून ही, प्रयत्नाअंती परमेश्वर! हे ही लक्षात ठेवायला हवे. समलिंगांचे आकर्षण असणाऱ्यांमध्ये ज्या गोष्टी मूळे ही विकृती आली आहे ती दूर करण्याचा प्रयत्न केला जायला हवा. एखाद्या व्यक्ती मध्ये गत आयुष्यातील वाईट आठवणींचा मानसिकदृष्ट्या योग्य पणे निचरा झाला नसेल. वा त्याच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील वा त्याचे तेजोवलय दुषीत व असंतुलित झाले असेल तर त्यावर उपाय शोधून उपचार केले जायला हवेत. अशा अर्थाचे मी वरील प्रतिसादात (शेवटी) मत मांडले होते.
येथील बहुतेकांची मते पाश्च्यात्य लेखकांनी मांडलेली मते अक्शरशः घोकंपट्टी केल्यासारखी मांडलेली आहेत. स्वतःची अक्कल खुंटीला टांगली की काय ह्या लोकांनी?