अत्यंत टुकार पुस्तक.  माझ्या परदेशातून आलेल्या मुलाला ते दाखवून रस्ते समजावून सांगण्याचा मी प्रयत्‍न केला. काही जमले नाही. शेवटी कागदावर हाताने नकाशे काढून दाखवावे लागले. पुस्तकाची छपाई अत्यंत वाईट, रस्त्यांची नावे वाचता येत नाहीत.  फक्त व्यावसायिक जाहिरातदारांच्या संस्थांची नावे ठळक अक्षरात. शाळा, महाविद्यालये सापडत नाहीत.  पुण्याची खासियत म्हणजे गल्ल्याबोळ आणि देवळे.  कित्येकांचा साधा उल्लेखही नाही.  उपग्रहावरून छायाचित्रित केल्यासारखे नकाशे. दापोडीच्यापुढे वाढलेले पुणे नकाशाकारांना माहीतच नाही.