वरील प्रतिसादामध्ये "मी किती पुरोगामी आहे हे दाखविण्याची चढाओढ" असा, ज्याला छद्मयुक्त म्हणता येईल असा उल्लेख वाचून करमणूक झाली. एखाद्या मुद्द्यावर कोण बरोबर आहे किंवा काय बरोबर आहे याबद्द्दल विशेष भाष्य न करतां, कोण बोलते आहे हे लक्षांत घेऊन प्रतिक्रिया देणे विशेष रोचक वाटले. असो. पुरोगामी लोकांच्या पुरोगामीपणामध्ये जो बेगडीपणा आहे असा निर्देश केला गेला आहे तो बेगडीपणा नेमका कसा आहे, काय आहे ते कळल्यास उपकार होतील   नाहीतर काठावर बसून "दिखाऊपणा"बद्दल ताशेरे ओढणाऱ्यांबद्दल वेगळे बोलायला नको.