कुणालाही लेबल लावणे फारच सोपे असते. समलैंगिकतेच्या विरोधात कैच्याकै विधाने, कुठलाही पुरावा नसताना दिलेली इथे दिसतात. उदा. लैंगिक शिक्षणाची गरज नाही, भारतात कुमारी मातांची समस्या नाही, हा मनोविकार आहे इ. समलैंगिकतेच्या बाजूने घाऊक विधाने कुठे झाली हे जाणून घ्यायला आवडेल. शिवाय यात पुरोगामी दाखवण्याची चढाओढ म्हणजे नेमके काय? आणि कोण कुणाला दाखवणार? मसवर* एखाद्याची एक विशिष्ट प्रतिमा असली तरी मस म्हणजे जग नव्हे. सुदैवाने बाकीचे जग मसपेक्षा मोठे, रोचक आणि वैविध्यपूर्ण आहे. इथे येणाऱ्या शे-दोनशे लोकांमध्ये एखाद्या तऱ्हेची प्रतिमा झाली तरी त्याने फारसा फरक पडेल असे वाटत नाही. असो.
हॅम्लेट
*मस : मराठी संकेतस्थळे. हे मसं असे हवे पण ते उच्चारायला कठीण म्हणून त्याचे मस केले.