वरदा प्रकाशन शोधायला मला एके काळी अर्धा दिवस लागला होता.  त्यांचा पत्ता आहे ३९७/१ सेनापती बापट रोड. सेनापती बापट रस्त्यावर रत्‍ना हॉस्पिटल, जय-विजय-कपिलवस्तू इत्यादी सोसायट्या आहेत. त्यांचे घरनंबर ३९७ अपॉन काहीतरी आहेत. म्हणजे वरदा त्याच ओळीत हवे. प्रत्यक्षात, वरदा प्रकाशन रस्त्याच्या विरुद्ध फुटपाथला असलेल्या बाजूकडून, वेताळबाबा चौकातून फुटणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर आहे. म्हणजे ३९७/१ हा नंबर सर्व ३९७ नंबरांहून विभक्त होऊन लांब आणि वेगळा पडला आहे. त्यामुळे जय-विजय-कपिलवस्तू या सोसायट्यांतला कुठलाही वॉचमन मला ३९७/१ कुठे आहे ते सांगू शकला नाही. शिवाय, प्रकाशनाचा अधिकृत पत्ता वेताळबाबा चौक नसून, ट्रॅफ़िक सिग्नल चौक असा आहे. अशा नावाचे चौक, म्हटले तर अनेक आणि तसे म्हटले तर एकही नाही. विकिमॅपिया किंवा पुणे ए टु झेड वापरले असते, तर पत्ता चटकन मिळाला असता हे नक्की!