पोष्टात गेल्यानंतर दिसणाऱ्या समोर काऊंटरवर बसलेल्या लोकांचा पत्रे पोचवण्याशी काही संबंध असतो असे वाटत नाही. (म्हणजे त्यांनी दिलेली तिकीटे लावून पत्र पाठवले जाते इतका दूरचा संबंध वगळल्यास!).. काऊंटरवरील मंडळी ही सादारणतः तिकिटे, मनीऑर्डरी, पोष्टल बचत योजना किंवा तारा यामध्ये पटाईत असतात.  पत्रांचा बटवडा आणि शिक्के मारुन त्यांचे सॉर्टिंग करणे ही कामे मागे ब्याकस्टेजवर चालतात. त्यामुळे पोष्टात जाऊन पत्ता विचारल्यास "माहीत नाही" हे उत्तर मिळण्याची शक्यता जास्त आहे असे वाटते. त्याऐवजी ट्राफिक पोलिसांना पत्ता विचारल्यास ते अनेकदा योग्य उत्तर देतात असा अनुभव आहे.