मला ह्या चर्चेत अजिबात स्वारस्य नाही पण एकूण प्रतिसाद बघता मानवी मनाविषयी लिहावेसे वाटते. कोणताही प्रष्ण आपल्यासाठी महत्त्वाचा तेंव्हाच होतो जेंव्हा त्याच्यामुळे आपल्या अस्तित्वाला किंवा सुखाला धोका आहे असे वाटते. चर्चेला प्रतिसाद हा वेळ घालवण्यासाठीही दिला जातो पण ज्यानी तो प्रस्ताव मांडला त्याच्यासाठी तो वास्तविक असतो. म्हणून कोणताही प्रष्ण सोडवताना पहिली गोष्ट म्हणजे हा माझा प्रष्ण आहे अशी प्रमाणिक मांडणी हवी. पण मुळातच टोपणनावानी विचारलेला प्रष्ण त्यात ऑथेंटिसिटी कशी असेल? त्यामुळे त्या प्रष्णाला सार्वजनिक स्वरूप दिले जाते (विवाह संस्था/समाज/व्यक्तिचे स्थान) अश्या पद्धतीनी फसव्या प्रष्णाची मग फसवी उत्तरे मिळायला लागतात. एकदा हा माझा प्रष्ण आहे असा प्रामाणिकपणा असला की माझ्या अस्तित्वाला किंवा सुखाला नेमका कसा धोका आहे याची सुव्यवस्थीत मांडणी होते. मग त्या विषयातला तज्ञ म्हणजे ज्यानी असे प्रष्ण सोडवले आहेत तो तुम्हाला मार्ग दाखवतो, निदान तशी शक्यता तरी निर्माण होते.
जर प्रष्णकर्त्याकडे एवढा प्रमाणिकपणा असेल आणि तो मी म्हणतो त्याप्रामाणे त्याच्यावर होणाऱ्या परिणामांची व्यवस्थीत मांडणी करायला तयार असेल तर उत्तर माझ्याकडे आहे. किंवा त्याला केवळ त्याच्या प्रामाणिकपणामुळे सुद्धा योग्य मार्ग सापडेल. पण याचा समाजावर किंवा विवाहसंस्थेवर शून्य परिणाम होईल. ही स्थिती अपवादात्मक आहे आणि अपवाद नेहेमी नियमच सिद्ध करतो त्यामुळे स्त्री-पुरूषातले नैसर्गिक आकर्षण, त्यावर बांधली गेलेली विवाह व्यवस्था आणि त्यातून तयार झालेला समाज याला काहीही होणार नाही.