म.टा मध्यल्या लेखात चुक काय ?
लेखाच्या सुरुवातिलाच, ( इतरांच्या मते ) ब्राम्हणी मनोवृत्ती म्हणजे काय हे स्पष्ट करुन, त्याचा सामजिक संदर्भ स्पष्ट केला आहे. पुढच्या अख्या लेखात, प्रतिभा जोशी, " त्या" वृत्तीबद्दलच बोलतं आहेत. ब्राम्हणांबद्दल नाही.
डान्सबार मधील स्त्रियांच्या शोषणाचे विष्लेशण, ज्या पद्धतीने करण्यात आले आहे, त्यावरुन हा लेख "उथळ" आहे, असे अजिबात वाटले नाही. लेखामधील टिका ही ब्राम्हणांवर नसुन, "त्या" प्रवृत्तीवर आहे. त्यात इतर जाती-धर्मातील लोकं आपोआपच आलीत.
"डान्सबार वरील बंदी हा "ब्राम्हणी मनोवृत्तीला" चुचकारणे" हा आरोप, प्रतिभा जोशी ह्यांनी केला नसुन, वर्षा काळे ह्यांनी केला आहे. हा आरोप त्यांनी का केला असावा, ह्याचा वेध ह्या लेखात घेतला गेला आहे.
'चौफुल्यात किंवा डान्सबारमध्ये बायांना नाचायला लावून त्यांच्यावर दौलतजादा करणारी प्रवृत्ती ही नाच गाण्यात ऐयाशी करणाऱ्या पेशवाईपेक्षा आणि राजेरजवाड्यांपेक्षा फारशी निराळी नाही...'
ह्यावाक्यात , दोष फ़क्त ब्राम्हणांना न देता, ईतरांनाही दिला गेला आहे. सर्व राजे काही ब्राम्हण नव्हते. मुळातच रोख हा व्याक्तिं/जातीवर नसुन "बायांना नाचायला लावून त्यांच्यावर दौलतजादा करणाऱ्या प्रवृत्ती"वर आहे.
लेख नीट वाचला तर, टिकेचा रोख हा, पुरुष, समाजातील तथाकथीत विचारवंत, भ्रष्ट नेते मंडळी, प्रतिष्ठित गुंड-मवाली, ह्यालोकांवर आहे. ह्या लोकांकडून , आजच्या स्त्रिचे होणारे शोषण आणि एकेकाळी ब्राम्हणांनी केलेलं इतर जातींच शोषण, ह्यात काहीतरी साम्य आहे, हेच हा लेख दर्शवीतो. ते साम्य म्हणजे एक विशिष्ठ मनोवृत्ती असुन, ती मनोवृत्ती म्हणजेच "ब्राम्हणी मनोवृत्ती" काय ? अशा आशयाचा प्रश्नही लेखिका शेवटी विचारते.
"जावईशोध प्रतिमाताईंना कुठून लागला कळायला मार्ग नाही"
ब्राह्मणांनी गप्प बसून सहन करीत बसू नये.
त्या लेखाबद्दल प्रतिसाद देण्यासाठी, त्या लेखाखालीच link दिली गेली आहे. आपले मुद्दे मांडायला, प्रतिभा जोशी इथे नाहीत. आपले मुद्दे तिथेच मांडले असते, तर, बहुदा, प्रश्नाचं उत्तरही मिळालं असतं आणि, गप्प बसून न राहता, योग्य त्या ठिकाणी बोलल्याच समाधानही झालं असतं.
निदान आर्थिक सामर्थ्य वापरुन एक प्रबळ लॉबी बनवली तर असल्या गोष्टींना आळ बसेल कदाचित्.
आधी आमच्याकडे ज्ञान आहे असं "भासवून" इतरांना गप्प केलं, आता पैसा ??
प्रतिभा जोशी हयांनी ,ब्राम्हणी मनोवृत्ती म्हाणून ज्या वृत्ती मांडल्या आहेत, तशा वृत्ती त्याकाळच्या / आजच्या ब्राम्हणांमध्ये आहेत का ? ह्यावर थोडी चर्चा आवश्यक आहे, अस मला वाटत.
मयुरेश वैद्य.