दिलखुलास प्रतिसादाबद्दल मनापासून आभारी आहे, आजानुकर्ण.
खेळ काही चाललेला अंगणी जाई-जुईचा...
अन तिथे ओठंगलेला तारकांचा एक झेला!
या शेराचा अर्थ ः
- अर्थ साधासुधाच आहे :)
(कवी! )कल्पना अशी आहे की ः
जाई आणि जुई [(मुली नव्हेत; तर या फुलांच्या वेलीवरील फुलांचे गुच्छ, झेले :)] काहीतरी खेळ खेळत आहेत अंगणातल्या मांडवावर. वाराही त्यांच्याबरोबर आहेच!!! हा खेळ आकाशातून एक तारकांचा पुंजका (जाई-जुईसारखाच पांढराशुभ्र गुच्छ! म्हणजे झेला)- कसा कुणास ठाऊक (! )- पाहतो... आणि त्या तारकांचे कुतूहल जागे होते. कोणता बरं खेळ खेळत असतील, जाई-जुई? म्हणून तो साराच तारकापुंज ओठंगून पाहत आहे. जाई-जुईच्या खेळात डोकावत आहे... (कदाचित, आपल्यालाही घेतील त्या खेळायला! ).... आपणही जाई-जुईबरोबर, वारयाबरोबर खेळू आणि लुकलुकू...!!!
(हा झाला अगदी साधा अर्थ... आता ज्याने-त्याने आपापली प्रतीके, प्रतिमा लावून आणखी वेगळा अर्थ शोधायलाही हरकत नाही. ) :)
- प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. मनापासून आभार.