भारत हा अनेक धर्माच्या/पंथाच्या लोकांनि बनलेला देश आहे. इथे  किरकोळ रजा, आजारपणाच्या रजा तश्याच धार्मिक रजा हा रजांचा अजून एक पोटप्रकार असावा. त्याखाली प्रत्येकाला विशीष्ट दिवस (उदा. १० दिवस) मंजूर करून हवा तो धार्मिक सण साजरा करण्याची सोय करावी. म्हणजेच ईदची सुट्टी हवी असेल तर दिवाळीला काम करावे लागेल किंवा दिवाळीची सुट्टी हवी असेल तर ईदला काम करावे लागेल. (दोन्हीही साजरे करायचे असेल तर नाताळला आणि गुरू नानक जयंतीला काम करावे लागेल) अश्याने कुणाच्या भावनाही दुखावल्या जाणार नाहीत आणि प्रोडक्टीव्हीटीही वाढेल.