ब्राह्मण या जातिसंबंधी कुठले विशेषण बनवून त्याची आपल्याला सोयिस्कर व्याख्या करायची आणि मग त्या वृत्तीवर गलिच्छ चिखलफेक करायची. लेखात उल्लेखलेली वृत्ती काय भूतकाळातील वा वर्तमानकाळातील ब्राह्मण जातीची मक्तेदारी होती काय?
उद्या मी असहाय स्त्रीवर बलात्कार करण्याची दुष्ट वृत्ती म्हणजे मराठा मनोवृत्ती म्हटले आणि त्यावर असला लेख लिहिला तर तो संपादक छापतील का? अन्य धर्माच्या लोकांवर अत्याचार करणे, त्यांची देवळे तोडणे ह्याला मुसलमानी मनोवृत्ती म्हटले तर जाळपोळ होते. मग ब्राह्मणाची जात अपवाद का? लोकांना आपापल्या देशा, जाती, धर्मा, वंशाबद्दल आपुलकी असते. जरी त्या गटातले आपले सदस्यत्व बऱ्याचदा जन्मजात असले तरी ती आपुलकी कमी होत नाही. मग उगाच मी माझ्या जातीला काय वाट्टेल ते म्हटलेले का सहन करावे? मी उभ्या जन्मात कुठल्या ब्राह्मणेतर जातीवर अत्याचार केलेले नाहीत. मग माझ्या पूर्वजांची शिक्षा मला कशाला? हे म्हणजे ज्या चुका उच्चजातीनी केल्या त्या सर्व केवळ ब्राह्मण जातीला सव्याज परत करण्याचा प्रकार आहे. हा अगदी अन्यायकारक प्रकार आहे.
आपली आघाडीची दैनिके आपले विशिष्ट कलुषित विचार सोडत नाहीत असा आजवरचा अनुभव आहे. कित्येकदा विरोधी विचार मांडणारी पत्रे प्रकाशित केली जात नाहीत. त्यामुळे तिथे शक्ती व्यर्थ दवडण्यापेक्षा मनोगतसारखे स्थळे जिथे निदान काही लोक तरी झापडबंद नाहीत तिथे विचार मांडलेले मला बरे वाटतात. इथे निदान संवाद होऊ शकतो. सध्या इतकी टोकाची ब्राह्मणद्वेष्टी जनता बुद्धीवंत म्हणून मिरवत आहे हे लोकांच्या नजरेस आणून देणे महत्त्वाचे आहे. आणि ते मी करत आहे. जर मला शक्य असेल तर अजूनही काही करीन. आपणास प्रतिभा जोशी माहित असतील तर त्यांना मनोगतवर बोलवा की!
ब्राह्मणांनी आपल्याकडे ज्ञान आहे असे "भासवून" इतरांना गप्प केले हा आपला दावा पोकळ आहे. इतर लोक काय नंदीबैल होते काय? मूठभर लोकांच्या "काव्याला" बळी पडले ही ह्या ढीगभर लोकांचीही चूक आहे.
लोकशाहीमधे काही मागण्या पदरात पाडायच्या असतील तर व्होटबँक किती मोठी ते बघतात. मुसलमानांनी ही शक्ती वापरुन कायद्यात अत्यंत अन्यायकारक बदल केले आहेत. तेव्हा पुरोगामी लोक गप्प होते. मग ब्राह्मणांनी आपली शक्ती वापरुन जातिवाचक अपमानाला विरोध करायचे ठरवले तर आपल्या पोटात का दुखते?