त्याचबरोबर इथे पार्सलला सुद्धा 'प्याकेज' म्हणतात त्याने माझाही सुरुवातीला असाच घोळ झाला होता.
मी घरी नसताना कुरीयरवाला आल्याने तो माझे पार्सल आमच्या अपार्टमेंटच्या हापीसात ठेऊन गेला. संध्याकाळी घरी आल्यावर मी म्यानेजरला, 'माझे पार्सल आले आहे का?' असे विचारले तर त्याला काही बोध होईना. शेवटी माझे हातवारे बघून त्याने साधारण अंदाज केला आणि 'ओह यू मीन प्याकेज' असे म्हणत कपाटातून माझे पार्सल काढून दिले.